हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मतदार ओळखपत्र (Voter ID) हे आपल्या सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. याशिवाय आपल्याला कुठल्याही निडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही. त्यामुळे ते अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवावे लागते. मात्र कधी-कधी असे होते की, आपले मतदार ओळखपत्र कुठेतरी हरवले जाते. मात्र आता कार्ड हरवले तरीही काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण आपल्याला मतदार ओळखपत्र पुन्हा डाउनलोड करता येऊ शकेल. मतदान करण्याव्यतिरिक्त आपल्याला ते ओळखपत्र म्हणूनही वापरता येते. याशिवाय अनेक सरकारी कामांमध्येही याचा उपयोग होतो.
अशा प्रकारे Voter ID डाउनलोड करा-
>> डिजिटल Voter ID साठी http://voterportal.eci.gov.in वर रजिस्ट्रेशन करावा लागेल.
>> यानंतर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल https://www.nvsp.in/account/login वर लॉग इन करावे लागेल.
>> लॉगिन केल्यानंतर तुम्हाला EPIC क्रमांक किंवा फॉर्म क्रमांक द्यावा लागेल.
>> आता तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर एक ओटीपी येईल.
>> आपल्याला वेब पोर्टलवर ओटीपी एंटर करावा लागेल.
>> यानंतर तुम्हाला बर्याच वेबसाइटवर दिसतील, तुम्हाला डाउनलोड Download e-EPIC वर क्लिक करावे लागेल.
>> आता तुमचा डिजिटल Voter ID पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होईल.
कलरफुल ओळखपत्रही बनवता येते
याशिवाय कलरफुल आणि प्लास्टिक Voter ID देखील बनवता येईल. आपण घरबसल्या या कार्डसाठी अर्ज करू शकता. ते आकारानेही लहान असून त्याची प्रिंटिंग क्वालिटी देखील चांगली आहे. तसेच हे कार्ड बनविण्यासाठी फक्त 30 रुपये खर्च येईल. याशिवाय Voter ID संबंधित कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर 1950 वर संपर्क साधता येईल.
हे पण वाचा :
Nothing Phone 1 : Nothing ब्रँड चा पहिला स्मार्टफोन घालणार धुमाकूळ; पहा फिचर्स आणि किंमत
Business : ‘हा’ व्यवसाय सुरू करून दर महिना मिळवा लाखो रुपये !!!
Business ideas : ‘या’ रोपांची लागवड करून कोट्यवधी रुपये !!!
Bank of Maharashtra मधून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मिळणार ‘हा’ फायदा, MCLR मध्ये केली कपात
जबरदस्त लूक अन् वेगाने चार्जिंग होणाऱ्या जगातील टॉप 5 Electric Cars !!!