नवी दिल्ली । गुगल पे अॅपने आंतरराष्ट्रीय पेमेंट्स आणि मनी ट्रान्सफरच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेतून याला प्रारंभ झाला. आता अमेरिकेत, (Google Pay) यूजर्स भारत आणि सिंगापूरमधील त्यांचे कुटुंब आणि मित्रांना पैसे ट्रांसफर करु शकतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, गूगल पैसे ट्रांसफर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी वेस्टर्न युनियन (Western Union) बरोबर भागीदारी करत आहे. वर्षाच्या अखेरीस, गूगल पे यूजर्सना सुमारे 200 देशांमध्ये पैसे ट्रांसफर करण्याची सुविधा मिळू शकेल. गूगल देखील आणखी एका पेमेंट प्लॅटफॉर्म Wise बरोबर करार करत आहे. असे मानले जात आहे की, गुगल पेचे आंतरराष्ट्रीय मनी ट्रांसफर वेस्टर्न युनियनमार्फत होईल. तथापि, दोन्ही प्लॅटफॉर्मची सोय असलेल्या देशांमध्ये यूजर्सना ट्रांसफर करताना निवडण्याचा पर्याय असेल.
अमेरिकेमधून केवळ अमेरिकन डॉलर्समध्ये रक्कम पाठविली जाऊ शकते
गूगल पेद्वारे मनी ट्रान्सफर करणे सोपे आहे. अमेरिकेमध्ये, आपले कुटुंब आणि मित्र गूगल पेवर आपला फोन नंबर सर्च करू शकतात. हाच फोन नंबर भारतातील गुगल पे अॅपवर नोंदविला गेला पाहिजे आणि भारतीय बँकेच्या खात्याशी लिंक केला पाहिजे. अमेरिकेतील व्यक्तीने आपल्या डिटेल्स निवडल्यानंतर त्यांना आपल्याला पाठवू इच्छित असलेली रक्कम एंटर करावी लागेल. ही रक्कम फक्त अमेरिकेतून अमेरिकन डॉलरमध्येच पाठविली जाऊ शकते. त्यानंतर ते वेस्टर्न युनियन आणि Wise यांच्यातील एकाची निवड करतील. त्यानंतर त्यांना हे समजेल की, पैसे ट्रान्सफर करण्यास किती वेळ लागेल आणि करन्सी कन्वर्जननंतर प्राप्तकर्त्यास किती पैसे मिळतील.
ट्रान्सझॅक्शनसाठी किमान रक्कम निश्चित केलेली नाही
Google कडून कोणत्याही आंतरराष्ट्रीय ट्रान्सझॅक्शनसाठी पाठविण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर वेस्टर्न युनियनने असे म्हटले आहे की, जूनच्या मध्यापर्यंत या ट्रान्सझॅक्शनवर कोणतेही अतिरिक्त ट्रान्सझॅक्शन चार्ज आकारला जाणार नाही. ट्रान्सफर केलेली रक्कम Google खात्याशी संबंधित असलेल्या खात्यावर थेट येईल. अमेरिकेमध्ये, युझर्स त्यांच्या Google पेसह लिंक असलेल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डसह पैसे पाठविण्यास सक्षम असतील. या ट्रान्सझॅक्शनसाठी कोणतीही किमान रक्कम निश्चित केलेली नाही. तथापि, जास्तीत जास्त रक्कम देण्याच्या पद्धतीसह विविध कारणांवर अवलंबून असू शकते.
25 कोटींहून अधिक लोकांनी 500 अब्ज डॉलर्सहून अधिक पैसे ट्रान्सफर केले
नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालात असे सांगितले गेले होते की, गेल्या वर्षी 25 कोटींहून अधिक लोकांनी 500 अब्ज डॉलर्सहून अधिक पैसे ट्रान्सफर केले. आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्सफरवरील फी अजूनही जास्त असून ती ट्रान्सफर रकमेच्या सरासरी 6.5 टक्के असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा