इतर वैद्यकीय उपाय एकत्रितपणे केल्याशिवाय केवळ संचारबंदी हा एकमेव उपाय या साथीच्या आजाराच्या काळात प्रभावी ठरणार नाही.
सौम्या स्वामिनाथन
लढा कोरोनाशी | जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी एका मुलाखतीत covid- १९ हा आजार दूरपर्यंत चालणार असल्याचे सांगितले, इतर वैद्यकीय उपाय एकत्रित केल्याशिवाय केवळ संचारबंदी प्रभावी ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ स्वामीनाथन यांनी क्षयरोग आणि एचआयव्ही वर ३० वर्षे संशोधन केले आहे. त्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या २०१५-२०१७ या काळात महासंचालक होत्या. त्यांच्या संपादित मुलाखतीचा जयश्री देसाई यांनी अनुवाद केला आहे.
प्रश्न- SARS-CoV-2 कशाप्रकारे जगभर पसरत आहे? याबद्दल आतापर्यंत आम्हाला हवी असलेली माहिती पुरेशी आहे?
उत्तर – विषाणूचे संक्रमण आणि त्याच्या उत्क्रांतीच्या गतीचा अभ्यास हा डाटाच्या अनुवंशिक क्रमाच्या विश्लेषणावरून करता येऊ शकतो. GISAID च्या व्यासपीठावर सद्यस्थितीत ४५०० विषाणूचे क्रम जमा आहेत. पैकी १० भारतीय अनुवांशिक प्रवृत्ती आहेत. आपण पाहिलं आहे की, अनुवंशिक प्रवृत्तींमध्ये कालांतराने बदल होत असतात. विषाणू एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये जात असताना त्यात अनुवंशिक बदल (बिघाड) होणे अपेक्षित असते. पण विषाणूचा एखादा घटक जसे की, तुलनेने कमी स्ट्रॅन्ड बनणाऱ्या अमिनो ऍसिडच्या क्रमांची पुनरावृत्ती होणारे प्रोटीन स्पाईक किंवा आरएनए पॉलिमरेझ किंवा प्रोटिझ एंझाइम या लस किंवा औषधांना लक्ष्य करणाऱ्या घटकांमध्ये कोणत्या प्रकारचा अनुवंशिक बदल (बिघाड) झाल्याचे निरीक्षण आतापर्यंत करण्यात आले नाही. म्हणून आता ज्या काही उपचारात्मक रणनीती आणि लसी विकसित केल्या जात आहेत त्यामुळे विषाणूमध्ये कोणताही बदल होऊ नये यावर आम्ही विश्वास ठेवतो.
प्रश्न- संचारबंदी एक रणनीती म्हणून प्रभावी असल्याचे काय पुरावे आहेत?
उत्तर- जागतिक आरोग्य संघटनेने अत्यंत स्पष्टपणे सामाजिक अलगाव ठेवण्यास सांगितले आहे. ज्याचा एक प्रभावी प्रकार संचारबंदी आहे, जो लोकसंख्येमध्ये विषाणूचे संक्रमण कमी करण्यास मदत करेल. चीनमध्ये त्यांना (संचारबंदीनंतर) असे दिसून आले की घरांमध्ये अजूनही संक्रमण होत होते, म्हणून त्यांनी आणखी एक पाऊल उचलून लक्षणे असणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यास सुरुवात केली, जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना वेगळ्या ठिकाणी नेले गेले जिथे त्यांना अलगावमध्ये ठेवता येईल आणि उपचारही देता येतील. पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांना अलगावच्या विशेष सुविधा देता येतील. जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी राहत असाल तर तुमच्या संक्रमणाची शक्यता जास्त आहे, त्यामुळे अशाप्रकारच्या गोष्टी करीत असताना आपण त्यांच्या तर्कांचा पण विचार केला पाहिजे. जास्त प्रभावी परिणामांसाठी इतर सार्वजनिक गोष्टी जसे की हात धुणे, निर्जंतुकीकरण, खोकत असताना तोंड आणि चेहरा झाकून घेणे आणि मास्क वापरणे या सगळ्या गोष्टी एकत्रित अंमलात आणणे आवश्यक आहे. शेवटी संचारबंदी उठल्यानंतर आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण या संसर्गाला खूप काळ सामोरे जाणार आहोत, त्यामुळे आपण शाश्वत रणनीतींचा विचार करणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने केसेस शोधणे, अलगावमध्ये ठेवणे, उपचार करणे आणि त्यांचा मागोवा घेणे या गोष्टी करीत असताना लोकांनी त्यांचे वागणे बदलले पाहिजे, शारीरिक अलगाव पाळला पाहिजे, स्वतःची स्वच्छता सुधारली पाहिजे.
प्रश्न – प्रत्येकाने मास्क लावला पाहिजे का?
उत्तर – कुणीही ज्यांच्यामध्ये लक्षणे आहेत त्यांनी मास्क वापरला पाहिजे. जसे आरोग्य कर्मचारी बऱ्याच रुग्णांना बघत असतात. त्यामुळे त्यांनी मास्क लावणे आणि वैयक्तिक संरक्षक उपकरणे वापरणे गरजेचे आहे यात काहीच शंका नाही. जेव्हा आपण सामान्य जनतेबद्दल बोलतो तेव्हा असा तर्क आहे, तुमच्यात कोणती लक्षणे नसतील तरी तुम्हांला संक्रमण असू शकते आणि ते पसरू शकते. प्रत्येकाने मास्क वापरण्याचा हाच तर्क आहे. लक्षणे नसणाऱ्या लोकांनी संक्रमण करणे फार मोठ्या प्रमाणात नाही. आमच्या आतापर्यंतच्या अभ्यासात हे प्रमाण १० ते १५% इतके दिसून आले आहे. मास्क वापरल्याने मास्क वापरणाऱ्याचे संरक्षण होत नाही तर इतर लोकांचे संरक्षण होते त्यामुळे मास्क वापरणे म्हणजे समाजाचे कल्याण होय.
प्रश्न- भारताने व्यापक तपासण्या केल्या पाहिजेत?
उत्तर- साथीचा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आकडेवारी महत्वपूर्ण आहे. आपण जास्तीत जास्त लोकांची तपासणी केली पाहिजे. खरं तर आपल्याकडे किट कमी असल्यामुळे आपण प्रत्येकाची सहज तपासणी करू शकत नाही. सुरक्षित देखरेखीचा एक मार्ग आहे तो म्हणजे म्हणजे ज्या लोकांना तपासारखे (आयएलआय )आजार आहेत त्यांची किंवा गंभीर श्वसनाचे विकार (एसएआरआय) असणाऱ्यांच्या तपासण्या करणे जे आयसीएमआर याआधीच करते आहे. बऱ्याच देशांमध्ये सेरॉलॉजिकल (शरीरातील द्रव पदार्थांची तपासणी) तपासणीची सुरुवात झाली आहे. ज्याने आपल्याला किती लोकसंख्येपर्यंत हा आजार पसरला आहे तसेच कोणत्या परिसरात (भौगोलिक) पसरला आहे याच्या प्रमाणाची कल्पना येते.
प्रश्न – उपचारामध्ये शिष्टाचारात हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केला पाहिजे याचा काही पुरावा आहे का?
उत्तर- Hydroxychloroquine (एचसीक्यू) ची तुलना Remdesivir (development code GS-5734) आणि Lopinavir/Ritonavir (कॅन्सर पेशी मारण्यासाठी कॅन्सरच्या औषधामध्ये प्रतीरोधक म्हणून वापरले जाते तसेच एचआयव्ही च्या प्रती बनवण्याची क्षमता रोखू शकते.)शी करून interferon (विषाणूचा संसर्ग होऊ म्हणून बनवलेले प्रथिन) बीटा सोबत आणि interferon बीटा शिवाय एकत्रित एक चाचणी दहा दिवसांपूर्वी सुरु करण्यात आली आहे. जसे की जगभरातील असे समूह जे यावर उपचार विकसित करीत आहेत, त्यांच्या सोबत येण्याचे कारण म्हणजे जास्त उपचारांचा समावेश करणे हे असून हे एकच ध्येय आहे. या सगळ्याचा दृष्टिकोन अँटिव्हायरल (विषाणूला रोखु शकणारा किंवा त्याच्या प्रतिकृती होण्यास अडवणारा एजन्ट) औषधे शोधणे, मोनोक्लोनल अँटीबॉडी (अशी प्रतिपिंडे जी आदर्श प्रतिकार शक्तीपासून बनविलेली असतात जी अद्वितीय पालक पेशींचे प्रतिरूप असतात.) उपचार किंवा एखादा सहाय्य्क उपचार जो विषाणूचा शरीरातील प्रतिसाद बदलण्यास मदत करेल हा आहे. आता सध्या covid -१९ साठी कोणतेच प्रभावी कार्यक्षमता असलेले औषध नाही आहे. काही दयेच्या स्वरूपात वापरण्यात अली आहेत पण वैज्ञानिक पुराव्यांचा काही आधारावर नाही. लवकरच आम्हांला वैद्यकीय चाचण्यांमधून प्रतिसाद मिळेल जे आपल्याला सांगितले जाईल.