हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यांवर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत बापट यांनी व्हिलचेअरवर बसून पक्षाचा प्रचार केला.
गेल्या अनेक महिन्यांपासून बापट आजारी आहे. मात्र आज अचानकच त्यांनी प्रकृती गंभीर झाली आहे. त्यामुळे सध्या ते आयसीयू मध्ये आहेत. गिरीश बापटांच्या प्रकृतीबाबत अधिकची माहिती अजून मिळू शकलेली नाही. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडून तासाभरात मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर बापट यांच्या आरोग्याविषयी अधिकची माहिती मिळू शकेल.
BJP MP Girish Bapat's has been admitted to Deenanath Mangeshkar hospital. He is critically ill and is currently on life support treatment: Deenanath Mangeshkar Hospital pic.twitter.com/3OXoUmRQow
— ANI (@ANI) March 29, 2023
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी फोनवरून गिरीश बापट यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. डॉक्टरांची फौजही बापट यांच्या प्रकृतीवर लक्ष्य ठेऊन आहे. गिरीश बापट हे भाजपचे मोठे नेते आहेत. दांडगा जनसंपर्क आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ही गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जाते. गिरीश बापट 1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली आणि पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. 2019 मध्ये त्यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा 96 हजार मतांनी पराभव केला होता.