लखनऊ : वृत्तसंस्था – सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमात धोखा दिल्याचं एक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या प्रकरणात रुग्णालयात भर्ती असलेल्या तरुणीनं आपल्या प्रियकरावर आणि त्याच्या मित्रांवर ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. या पीडित तरुणीने या सर्व जाचाला कंटाळून जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली आहे मात्र सुदैवाने तिचा जीव वाचला आहे. हि घटना उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद या ठिकाणी घडली आहे.
पीडित तरुणीने सांगितले कि, आरोपी प्रियकर शादाब याच्यासोबत तिची काही दिवसांपूर्वी मैत्री झाली होती. शादाबनं तिच्यावर प्रेम असल्याचं सांगत तिला प्रपोज केलं आणि हे नातं मैत्रीवरुन प्रेमात रुपांतरित झालं. यानंतर शादाबने दोघांचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ काढले आणि आता ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तो देत आहे. तसेच शादाबने हे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या मित्रांनाही पाठवले असल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
हि गोष्ट जेव्हा या तरुणीच्या घरच्यांना समजली तेव्हा तिनं पोलिसांत तक्रार करत आरोप केला, की शादाबनं तिला म्हटलं, की माझ्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेव अन्यथा 50 हजार रुपये दे. असं न केल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिली. यानंतर तरुणीनं पाण्यात उडी घेत जीव देण्याचा प्रयत्न केला. यानंतर तरुणीनं आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शादाब, आरिफ, सद्दाम आणि राशिद या चौघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.