कोरोनामुळे आईने गमावला जीव, धक्का सहन न झाल्याने मुलीने केली आत्महत्या ( Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सगळ्यांनी आपल्या घरातील कोणता ना कोणता सदस्य गमावला आहे. तर काही लोकांनी आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आत्महत्या केली आहे. असेच एक प्रकरण मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यात घडले आहे. या जिल्हातील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. जेव्हा आपल्या आईचा मृत्यू झाल्याची बातमी समजली तेव्हा मुलीला मोठा धक्का बसला. आपल्या आईच्या मृत्यूनंतर सदम्यात गेलेल्या मुलीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. तिच्या घरच्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न मात्र त्यांना तिला वाचवण्यात यश आले नाही.

हि घटना घडत असताना आजूबाजूचे लोक मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न होते. आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव रितिका होते. ती २३ वर्षांची होती. रितिका व तिची आई मंडिदीप ठाणा क्षेत्रातील हिमांशू मेघा सिटी कॉलनीमध्ये राहत होते. १ दिवसाअगोदरच रितिकाच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आपल्या आईच्या मृत्यूचा धक्का तिला सहन न झाल्याने तिने आपल्या फ्लॅटच्या बालकणीमधून उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या घरच्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न पण तिला वाचवण्यात त्यांना यश आले नाही. रितिका काही वेळ बालकणीमध्ये लटकलेल्या अवस्थेत होती. हे पाहून लोकांची गर्दी जमा झाली पण तिला वाचवायला कोणीही पुढे आले नाही उलट त्या घटनेचा व्हिडिओ काढण्यात सगळे मग्न झाले होते.

त्यानंतर काही वेळातच रितिका खाली कोसळली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी दाखल केले असता मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. जर उपस्थित लोकांनी व्हिडिओ बनवण्याऐवजी रितिकाची मदत केली असती तर कदाचित तिचा जीव वाचला असता.

Leave a Comment