हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका 14 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. सांगितले जात आहे की, मासिक पाळीविषयी (Menstruation) माहीत नसल्यामुळे ही 14 वर्षीय मुलगी तणावाखाली होती, शेवटी तिने मालवणीमधील लक्ष्मी चाळीत म्हणजेच आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस घटनेचा खोलवर तपास करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित 14 वर्षीय मुलगी पहिल्यांदा मासिक पाळी आल्यामुळे नैराश्यात होती. मासिक पाळीत होत असलेल्या त्रासामुळे ती प्रचंड वैतागली होते. यामुळे तिने मंगळवारी रात्री घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब शेजारी आणि नातेवाईकांना समजतात त्यांनी तिला तातडीने कांदिवली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे डॉक्टरांनी मुलीला तपासल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबाला दिली.
पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत कुटुंबाने सांगितले की, 14 वर्षीय मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यामुळे ती नैराश्यात होती. मासिक पाळीविषयीची अधिक माहिती तिला माहित नव्हती. यामुळे अशा स्थितीत नेमके काय करायला हवे हे तिला समजले नाही. यामुळे ती अधिकच गोंधळून गेली. शेवटी मासिक पाळीला वैतागून या तिने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. सध्या या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, यापूर्वी एका मुलीला मासिक पाळी आली असताना आपली बहीण गर्भवती राहिल्याचे समजून एका भावाने बहिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. यातूनच हे समोर आले की, महिलांना येणाऱ्या मासिक पाळीविषयी जनजागृती करण्याची किती आवश्यकता आहे. आता या घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबईमध्ये मासिक पाळीच्या नैराश्यातून एका मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.