मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात एका महिला वेटरने पुरुष ग्राहकांची रेस्टॉरंटमध्येच धुलाई केली (fight video) आहे. या ग्राहकांनी रेस्टॉरंटमध्ये असं काही केलं की महिला वेटर संतप्त झाली. रागात तिने रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना धू धू धुतलं (fight video) आहे.
ग्राहकाने केलेल्या कृतीमुळे संतप्त झालेल्या महिला वेटरने रेस्टॉरंटमध्येच केली धुलाई pic.twitter.com/SiRCIl949s
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 22, 2022
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन तरुण टेबलजवळ समोरासमोर बसले आहेत. एक महिला वेटर त्यांना खाणं सर्व्ह करतं आहे. ती त्या दोघांच्या मध्ये उभी आहेत. दोघांपैकी एक तरुण उठतो आणि महिला वेटरचा हात धरून तिला छेडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर महिला वेटरला इतका राग येतो ती त्याच्या तोंडावर रागात मुक्का मारते (fight video). महिलेच्या दोन मुक्क्यातच तो तरुण जमिनीवर कोसळतो. महिलेने त्याला मारताच (fight video) दुसरा तरुण त्याला वाचवण्यासाठी येतो आणि तोसुद्धा महिलेला मारायला (fight video) जातो. महिला त्या तरुणाला लाथेने मारते. त्यानंतर तो तरुण खुर्ची घेऊन महिलेच्या दिशेने फेकतो. महिला ती खुर्ची आपल्या हातात पकडते आणि पुन्हा त्याला लाथ मारते त्यानंतर तो तरुणसुद्धा जमिनीवर कोसळतो.
हि महिला वेटर एखाद्या प्रोफेशनल ज्युडो, कराटे एक्सपर्टप्रमाणे या दोन्ही तरुणांची धुलाई करते. या छेडछाड करणाऱ्या तरुणांना चांगलाच धडा मिळाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही कोणत्याही महिलेला छेडण्याची हिंमतही करणार नाही. महिलेला छेडण्यापूर्वी दहा वेळा तरी विचार करतील. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
हे पण वाचा :
टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर वर्षभरात गाठणार विक्रमी उच्चांक !!!
EPF खात्यातील रजिस्टर्ड मोबाईल नंबर अशा प्रकारे घर बसल्या बदला !!!
IPL ची प्रगती पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने BBL साठी केली ‘हि’ मोठी घोषणा
‘उद्धव ठाकरेंनी आता 11 आमदारांना घेऊन IPL टीम बनवावी; निलेश राणेंची जहरी टीका
एकनाथ शिंदेंच्या बंडावर उदयनराजेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले की…




