प्रेमाच्या मॅटरमध्ये तुरुंगात गेला, बाहेर आल्यानंतर ‘ती’च्या विरहात उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – म्हणतात ना प्रेम आंधळे असते. हि प्रेमात पडलेली माणसं कधी काय करतील याचा काही नेम नाही. अशीच काहीशी घटना वर्ध्यात घडली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुलीच्या वडिलांनी आपल्या प्रेयसीला आपल्यापासून दूर नेल्याच्या विरहामुळे या तरुणाने टोकाचे उचलले आहे. वर्ध्यातील वायगाव येथील सौरभ अनिल मस्के या तरुणाने वायगाव येथीलच एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत फुस लावून पळून नेले होते. यानंतर मुलीच्या वडिलांनी देवळी पोलीस ठाण्यात सौरभ विरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

यानंतर पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आणि आरोपी सौरभ मस्के याच्यावर कलम 363 भादवी तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सौरभचा जामीन फेटाळून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. यानंतर आपली शिक्षा पूर्ण करून सौरभ बाहेर आला. यानंतर सौरभ आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गावातच एक पान टपरी घेऊन भाड्याने राहत होता. मात्र समाजातील लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही वेगळाच असल्याने त्याच्या मनामध्ये चिंतेने घर केले.

आपली यामुळे समाजात खूप बदनामी झाली आहे. यामुळे त्याने कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं होते. मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे सौरभने आपली पान टपरी उघडली. दिवसभर व्यवसाय केला परंतु त्याच्या मनात चिंता सतावत असल्याने त्याने रात्री सातच्या सुमारास टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी देवळी पोलिसानी कलम 174 जा.फो. नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Leave a Comment