हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सरकारकडून गिव्ह ईट अप (Give Eat Up scheme) योजना सुरू करण्यात आली आहे. कोणतीही सरकारी योजना किंवा लाभ परत करण्यासाठी हा पर्याय महाडीबीटी पोर्टलवर असणार आहे. सद्यस्थितीमध्ये हा पर्याय 65 योजनांसाठी उपलब्ध आहे.
गिव्ह ईट अप योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांना सरकारी लाभ नाकरायचा पर्याय मिळेल. थोडक्यात, सरकारची एखादी योजना आपल्याला हवी नसल्यास किंवा आपल्याला त्या योजनेचा लाभ घ्यायचा नसल्यास आपण या योजनेअंतर्गत लाभ नाकारण्याचा अधिकार ठेवू शकतो. कौतुकास्पद बाब म्हणजे महाराष्ट्र हे देशातील असे पहिले राज्य आहे ज्या ठिकाणी गिव्ह ईट अप योजना लागू करण्यात आली आहे.
गिव्ह ईट अप रक्कम परत करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वीत होणाऱ्या सर्व योजनांकरीता Give It Up Subsidy पर्यायाचे बटन उपलब्ध असणार आहे. एखादया योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्जदाराने Give It Up Subsidy बटण निवडावे. यानंतर, pop-up window मध्ये यांची सूचना येईल. ही सूचना मान्य केल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल. हा OTP टाकल्यास Give It Up Subsidy ची प्रक्रिया पूर्ण होईल.