मला CBI द्या, मोदी- अदानींना 2 तासांत अटक करतो; AAP खासदाराने व्यक्त केला संताप

Narendra modi gautam adani
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय ने अटक केल्यानंतर आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. आप कडून केंद्र सरकार विरोधात निदर्शनेही करण्यात आली आहेत. त्यातच आता आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी आक्रमक होत मला ED- CBI द्या, 2 तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांना अटक करतो असं म्हंटल आहे.

लवकरच पीएम मोदींची हुकूमशाही संपुष्टात येईल. मनीष सिसोदिया यांना अटक करणे हा मोदी सरकारचा भ्याडपणा आहे. मला सीबीआय द्या, 2 तासात मोदी आणि अदानींना अटक करतो असं त्यांनी म्हंटल. जेव्हा तुमच्याकडे तपास यंत्रणांचा गैरवापर करण्याचा अधिकार असेल, तेव्हा तुम्ही काहीही करू शकता. भाजप अरविंद केजरीवाल यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे पण अशा कृत्यांचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही असं संजय सिंह म्हणाले.

दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना काल सीबीआयने अटक केली आहे. दिल्लीतील दारु घोटाळा प्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. गृह मंत्रालयानं सीबीआयला फीडबॅक यूनिटच्या माध्यमातून हेरगिरी करण्याच्या आरोपांबाबत मनीष सिसोदिया यांच्या विरोधात भ्रष्टाचार निर्मुलन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आणि चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्ली, हरियाणा, भोपाळ, चंदीगडसह देशाच्या विविध भागात आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यात आली आहेत.