हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनेकांचे जीव गेल्यानंतर केंद्र सरकारला जाग आली आहे. लस घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. रांगेत लोक मरत आहेत. पण आम्ही केंद्रावर बोललो की प्रवीण दरेकर यांना राग येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोबेल पुरस्कार द्यावा पण आता केंद्र सरकारने लस निर्यातीवर बंदी घालावी. अशी मागणी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. तसेच केंद्र सरकारने रेमडेसीवीर निर्यात बंदी घातली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मात्र, केंद्र सरकारने आता कोरोना लस निर्यातीवर देखील बंदी घालावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी आणि कामगार वर्गाची आज बैठक पार पडली. त्यावेळेस ते बोलत होते.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावीया बैठकीत कामगारांची कोरोना चाचणी करून कामावर प्रवेश देण्यात यावा, तसेच त्यांची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना कामावर घेऊ नये. कामगारांना आर टी पी सी आर टेस्ट बंधन कारक करण्याच्या सूचना कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या आहे. यावेळी व्यापाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी कामगारांचे लसीकरण केले जावे, तसेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली आहे. तसेच मुश्रीफ यांनी केंद्राकडून लस आली तर पुरवठा करू असल्याची ग्वाही कामगारांना दिली.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र, सुपातून जात्यात जायला वेळ लागणार नाही. नागरीक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस पुरवठा करावा. अनेकांचा जीव गेल्यानंतर केंद्र सरकारला जाग आली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने रेमडेसीवीर निर्यात बंदी घातली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मात्र, केंद्र सरकारने आता लस निर्यातीवर देखील बंदी घालावी अशी मागणी मुश्रीफ यांनी केली.