आरक्षण द्या आश्वासन नको – धनगर आरक्षण शिष्टमंडळ

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | धनगर सामाज्याला आरक्षण मिळावे यासाठी धनगर आरक्षणाचे एक शिष्टमंडळ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने गुरुवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेले होते.यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली, या बैठकीत सुभाष देसाई यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.

धनगर आरक्षणाबाबत शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासने दिली होती . त्यातील एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडून झाली नसल्याने धनगर नेते नाराज असून ते आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. धनगर आरक्षणाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत केली होती खरी, मात्र अद्याप धनगर आरक्षणची मागणी पूर्ण झाली नाही.

धनगर आरक्षणाचे काय झाले? अशी विचारणा करताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले, धनगर आरक्षणाबाबत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा ( टिस ) अहवाल राज्य सरकारला मिळाला असून त्याची छाननी सुरु आहे. महाधिवक्ता यांच्याकडे ते दिले असून ते कार्यवाही करतील.आचारसंहिता लागू होण्याआधी केंद्रसरकार कडे आरक्षणाबाबतची शिफारस करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा संघटनेने येत्या २७ फेब्रुवारीला चवदार तळ्यावरून शेळ्या-मेंढ्या ,गुरे-ढोर घेऊन मुंबई च्या आझाद मैदानावर येऊ असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. आम्हाला आश्वासने नकोत. एसटी चे सर्टिफिकेट द्या, आता शिफारशींचे आश्वासन नको अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

 

इतर महत्वाचे –

धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणारच -शिवेंद्रराजे भोसले

सरकारी नोकरी हवी आहे तर करा इथे अर्ज

शिवस्मारक स्थगिती तूर्तास लांबणीवर