भारताच्या अनेक भागात Gmail Down, युझर्सने केली ट्विटरच्या माध्यमातून तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । Google ची फ्री ईमेल सर्व्हिस Gmail मंगळवारी भारताच्या काही भागात काम करत नव्हती. यानंतर, अनेक युझर्सनी Gmail डाऊन असल्याची तक्रार करण्यासाठी ट्विटर, फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला. युझर्सनी दावा केला की, ते कोणतेही ई-मेल पाठवू किंवा मिळवू शकत नाहीत. डाउन डिटेक्टरच्या मते, 68 टक्के युझर्सनी सांगितले की, त्यांना Gmail मध्ये समस्या येत आहेत. त्याच वेळी, 18 टक्के लोकांनी सर्व्हर कनेक्शनमध्ये बिघाड नोंदवला. याशिवाय 14 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना लॉग इन करण्यात समस्या येत आहे.

युझर्स करत होते अशी तक्रार
भारतासह अनेक देशांतील युझर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Gmail वापरण्यास सक्षम नसल्याबद्दल तक्रार केली. एका युझरने लिहिले की, Gmail डाऊन आहे. मी कोणालाही मेल पाठवू शकत नाही. तसेच मला कोणताही मेल येत नाही. त्याचवेळी, दुसऱ्या युझरने लिहिले, ‘मला वाटते की, Gmail पुन्हा काम करत नाही किंवा मी एकमेव युझर्स आहे जो या समस्येला तोंड देत आहे.’ गुगलने अद्याप आपल्या युझर्सना यावर कोणतेही उत्तर दिले नाही. यापूर्वी गेल्या एका आठवड्यात फेसबुक दोनदा खाली आले आहे. Facebook सोबतच Instagram, Messenger आणि Whatsapp ही काही तासांसाठी बंद होते.

ट्विटरवर #GmailDown ट्रेंडिंग
Gmail सर्व्हिस बंद झाल्यानंतर ट्विटरवर #GmailDown ट्रेंड करत आहे. ट्विटरवर अनेक युझर्स सांगत आहेत की, त्यांची सर्व्हिस बंद आहे आणि बरेच जण तक्रार करत आहेत. सर्व्हरमधील समस्येमुळे फेसबुकला 400 अब्ज रुपयांपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले. यानंतर फेसबुकने माफीही मागितली. त्याच वेळी, Whats App ने म्हटले की तुमच्या संयमाबद्दल धन्यवाद. मात्र, 5 दिवसांतच Facebook ला दुसऱ्यांदा समस्यांना सामोरे जावे लागले. Whats App डाऊन झाल्यामुळे, 70 लाख युझर्स Telegram App मध्ये जोडले गेले. आता Telegram वर मंथली ऍक्टिव्ह युझर्सची संख्या 50 कोटींनी ओलांडली आहे.