घरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करा मोदींचे उच्चस्तरीय बैठकीत आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहून सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केलं होतं. या वेळी मोदींनी देशातील गावागावात जा, घरोघरी जा आणि कोरोनाची टेस्ट करा असे आदेश दिले आहेत.

तसेच देशात rt-pcr आणि अँटीजेन टेस्टची संख्या वाढवण्यात यावी कोणत्याही दबावाशिवाय राज्याने कोरोना रुग्णांची संख्या दाखवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा असेही मोदी म्हणाले आहेत. घरोघरी जाऊन कोरोनाची चाचणी करा. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढवा घ्या. आवश्यकता भासल्यास अंगणवाडी सेविकांना देखील सोबत घेण्यास त्यांनी सांगितले आहे. ग्रामस्थांना गृह विलगीकरणाचे नियम सोप्या आणि समजेल अशा भाषेत समजावून सांगा अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

काही राज्यांमध्ये व्हेंटिलेटरचा उपयोग योग्य प्रकारे होत नसल्याचे निदर्शनास आल्याने रिपोर्टची मोदींनी गंभीर दखल घेतली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या व्हेंटिलेटरचे ऑडिट करा. योग्य कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटर चालवण्याचे प्रशिक्षण द्या. अशा सूचना करतानाच व्हेंटिलेटर चा योग्य वापर होत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी मोदींना देखील माहिती दिली. देशात यापूर्वी कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. मार्चच्या सुरुवातीला सुमारे 50 लाख चाचण्या करण्यात येत होत्या. आता जवळपास 1.3 कोटी चाचण्या केल्या जात आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी मोदींना दिली आहे. तसाच पॉझिटिव्हिटी रेट घटत असून रिकवरी रेट वाढत असल्याचं अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी आरोग्य अधिकारीही उपस्थित होते. त्यांना जिल्हा स्तरापासून कोरोना स्थिती ऑक्सिजनची उपलब्धता आणि लसीकरणाची माहिती देण्यात आली.

Leave a Comment