औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ज्या गावात कोरोनाचे रुग्ण आहेत त्या गावांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत.
शहरी भागात असलेला कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पसरला आहे . त्यामुळे आतापर्यंत बाधित 210 गावांत सुपर स्प्रेडरचा शोध आणि तपासणी तसेच लसीकरण फोकस करण्याच्या सूचना ग्रामीण आरोग्य यंत्रणेला जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.
प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये अंगणवाडी सेविका तसेच शिक्षकांमार्फत सर्वेक्षण केले जाणार असून गावात कोणाला ताप येतो का , कोणाला सर्दी, खोकला झाला का, आदी आजाराच्या बाबत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारीही प्रत्येक गावात जाऊन कोविड संदर्भात नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागातून देण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group