मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मने वळवण्यासाठी दोनापावला येथील पंचातारांकित हॉटेलमध्ये भलत्याची ओळखपत्रे दाखवून शिरलेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) दोन नेत्यांना पणजी पोलिसांनी अटक केली आहे. सोनिया दोहान व श्रेय कोठीयाळ अशी अटक करण्यात आलेल्या संशयित नेत्यांची नावे आहेत. या प्रकरणाची राज्य गृहखात्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
त्यांचा डाव फसला
शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. हे बंडखोर आमदार 29 जून रोजी दोनापावला येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बहुमत चाचणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर सरकार कोसळल्यात जमा होते. तत्पूर्वी या बंडखोर आमदारांची मने वळवण्याची योजना आखून राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते सोनिया आणि श्रेय हे दोघे गुपचूपपणे त्या हॉटेलमध्ये दाखल झाले होते. मात्र त्यांचा हा डाव पूर्णपणे फसला.
हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांशी साधला संपर्क
1 जुलै रोजी सोनिया आणि श्रेय हे दोघे हॉटेलमध्ये दाखल झाले होते. या दोघांनी हॉटेलमध्ये दाखल होताना भलत्याचीच ओळखपत्रे वापरल्याचे लक्षात आल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने लगेच पणजी पोलिसांशी संपर्क साधला. पणजी पोलिसांनी भल्या सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या त्या खोलीवर छापा टाकला व या दोघांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता काल रात्री त्यांना अटक करण्यात आली.
संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी हॉटेलचे सुरक्षारक्षक प्रमुख विनोद नायर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयितांविरुद्ध भा.दं.सं.च्या 419 व 420 कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना, उपअधीक्षक सुदेश नाईक, निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सपना गावस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.
हे पण वाचा :
“साहेब मुंबईत बॅनरवर तुमचा फोटो ठेवणारा पहिला माणूस मी”; ‘या’ बंडखोर आमदाराचा व्हिडिओ व्हायरल
सत्ता गेली पण माज काही केल्या जात नाही…; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका
फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने गिरीश महाजन अजुन रडतायत; अजितदादांची जोरदार फटकेबाजी
औरंगाबादच्या नामांतरावरून अबू आझमी आक्रमक; सभागृहातच ‘मविआ सरकार’ वर हल्लाबोल
अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर आमच्या कानात सांगा…; मुनगंटीवारांनीही साधला निशाणा