हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Silver Price: देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम विक्रमी 56,200 रुपयांवरून घसरून 50,437 रुपयांवर आले आहेत. या दृष्टीने महिन्याभरात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 5763 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर ऑगस्टमध्ये चांदीची किंमत प्रति किलो 80,000 रुपये होती. जी आज 61,250 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे चांदीचे दर प्रति किलो 18750 रुपयांनी खाली आले आहेत.
सोमवारी, कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. आज एमसीएक्सवर सोन्याच्या किमती 0.22 टक्क्यांनी घसरून 50437 रुपयांवर आल्या. त्याचप्रमाणे चांदीचा वायदा दर 0.7 टक्क्यांनी घसरून 61,250 रुपयांवर आला. मागील सत्रात सोन्याच्या किमतीत 0.3% आणि चांदीमध्ये 0.2% घसरण झाली होती.
परदेशी बाजारात घसरण- जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव प्रति औंस 1,900 पर्यंत खाली आले आहेत. अमेरिकेत मदत पॅकेजबाबत सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बदललेली समीकरणे – तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, परकीय बाजारातील स्पॉट गोल्ड थोडासा बदल करून 1898 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आला आहे. मात्र, मजबूत अमेरिकन डॉलरने सोन्यावर थोडा दबाव आणला. अमेरिकन डॉलरला सामान्यत: सुरक्षित मालमत्ता म्हणून मानले जाते. त्याच वेळी, जगातील सर्वात मोठा सोन्या-समर्थीत एक्सचेंज-ट्रेड फंड असलेल्या एसपीडीआर गोल्ड ट्रस्टची होल्डिंग शुक्रवारी 0.27% घसरून 1,272.56 टनावर गेली.
तीव्र घट येऊ शकते – तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराविषयी चिंता कमी झाल्यामुळे सोन्याची गुंतवणूक कमी झाली आहे. म्हणूनच किंमतींवर दबाव आहे. जर येत्या काही दिवसांत अमेरिकन डॉलर मजबूत झाला तर सोने (Gold Silver Price) आणखी खाली पडू शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.