नवी दिल्ली । सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. ग्राहकांना शुद्धतेची गॅरेंटी देण्यासाठी सरकारने हे हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. हॉलमार्किंग दागिन्यांच्या शुद्धतेची गॅरेंटी देते. सरकारने गेल्या वर्षी जूनपासून हॉलमार्किंग अनिवार्य केले होते, त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जात आहे.
सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 256 जिल्हे निवडले आहेत, जेथे गोल्ड हॉलमार्किंगचा नियम अनिवार्यपणे लागू करण्यात आला होता. 30 नोव्हेंबरपर्यंत देशातील सुमारे 1,26,373 ज्वेलर्सनी हॉलमार्किंगसाठी रजिस्ट्रेशन केले आहे.
सध्या 256 जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे
आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग लागू करण्यात यावे, असा सरकारचा विचार आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 256 जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचे काम सुरळीत सुरू असून आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील 256 जिल्ह्यांमध्ये जेथे किमान एक असेयिंग आणि हॉलमार्किंग सेंटर-एएचसी आहे, 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग सर्टिफिकेट 23 जून 2021 पासून अनिवार्य करण्यात आले आहे.
ज्वेलर्सची वाढती संख्या
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) नुसार, गेल्या वर्षी जूनपासून हॉलमार्किंगसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन, ज्वेलर्ससाठी झिरो रजिस्ट्रेशन चार्ज यासारख्या सुविधांसह रजिस्टर्ड ज्वेलर्सची संख्या जवळपास चौपट झाली आहे.
या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी आतापर्यंत 1.27 लाख ज्वेलर्सनी BIS मध्ये रजिस्ट्रेशन केले आहे आणि सध्या देशात 976 BIS मान्यताप्राप्त हॉलमार्क केंद्र कार्यरत आहेत. ऑटोमेशन सॉफ्टवेअर लाँच झाल्यानंतर पाच महिन्यांच्या कालावधीत, देशात सुमारे 4.5 कोटी दागिने हॉलमार्क केले गेले आहेत.
शुद्धतेसाठी आवश्यक
मंत्रालयाचे म्हणणे आहे की, सोन्याचे दागिन्यांच्या उद्योगाच्या कामकाजात जास्त पारदर्शकता आणण्यासाठी आणि ग्राहकांना हॉलमार्कची विश्वासार्हता प्रदान करण्यासाठी Hallmarking Unique ID-HUID सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. संबंधितांशी सातत्याने चर्चा करून हॉलमार्किंग पद्धतीतील त्रुटी दूर करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नोव्हेंबर 2019 मध्ये, सरकारने जाहीर केले की,15 जानेवारी 2021 पासून देशभरात सोन्याचे दागिने आणि कलाकृतींचे हॉलमार्किंग अनिवार्य केले जाईल. पण कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर ज्वेलर्सनी आणखी वेळ मागितल्यानंतर ही मुदत चार महिन्यांनी वाढवून 1 जून आणि नंतर 23 जूनपर्यंत करण्यात आली.