अख्खा महाराष्ट्र मला 30 वर्षे ओळखतो; पडळकरांच्या हल्ल्यावरून अजितदादांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांच्या हल्ल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर आरोप केले. पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय, म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रचा बंगाल होऊ देऊ नका अस फडणवीस यांनी म्हंटल. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर देत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले

महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रत्येक माणसाला संरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण काही लोक म्हणतात की अजित पवारांवर जबाबदारी दिली तर चार दिवसांत राज्य विकून खाईल. ही काय पद्धत झाली का ? अहो, सगळा महाराष्ट्र मला ३० वर्षे ओळखतो, मी कुणाच्या मध्ये नसतो फक्त विकास कामांबद्दल मी बोलतो. असे अजित पवारांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, दोन्ही बाजूच्या लोकांनी आपल्याला विधानपरिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये लोकांचे प्रतिनिधी म्हणून पाठवलं जातं त्यावेळेस थोडे तारतम्य ठेवून वागलं पाहिजे,” असे अजित पवार यांनी म्हटले. मी शंभूराज देसाई यांच्याशी पडलकर याना संरक्षण देण्याबाबत चर्चा केली आहे. काही सदस्य संरक्षण नाकरतात. जे कोणी दोषी असतील त्या संदर्भात योग्य ती कारवाई करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं.