हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कधी कधी आपल्यावर अगदीच आणीबाणीची वेळ येते. ज्यावेळी आपल्याला आर्थिक मदतीची खूप गरज असते. अगदी इमर्जन्सी आल्यावर आपल्याला शक्य तितक्या लवकर पैसा गोळा करण्याची आवश्यकता असते. आणि अशी आपत्कालीन परिस्थिती हाताळायची असेल तर आपल्याकडे पैशाचे पर्याय तयार असावे लागतात. परंतु अनेकवेळा आपण भविष्यासाठी काही बचत करत नाही. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे हे आपल्याला सुचत नाही. यात शेवटचा मार्ग म्हणून आपण बँकांकडून कर्ज घेतो. (Gold Loan Or Personal Loan)
हे कर्ज घेताना सहसा आपण पर्सनल लोन किंवा गोल्ड लोन घेतो. (Gold Loan Or Personal Loan) परंतु यापैकी कोणतं लोन घेणे चांगले असते. हे आपल्याला कळत नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण फायद्याचा किंवा तोटाच्या विचार न करता त्या परिस्थितीमध्ये पैसा महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपण घाईगडबडीत निर्णय घेतो. परंतु आपण अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये गोल्ड लोन घेतले पाहिजे की पर्सनल लोन घेतले पाहिजे? तुमच्यासाठी कोणते लोन फायदेशीर ठरणार आहे. याची आपण सविस्तर माहिती आज घेणार आहोत.
कोणतं लोन फायद्याचं? | Gold Loan Or Personal Loan
तुम्ही कोणत्याही वित्त संस्थेकडूनचा पर्सनल लोन घेतले, तर ते लोन असुरक्षित स्वरूपाचे असते. कारण त्यावर जास्त व्याजदर आकारले जाते. त्याप्रमाणे तुमचा क्रेडिट स्कोर उत्पन्न यांसारख्या घटकांचा विचार करून तुमचा व्याजाचा दर ठरवला जातो. परंतु जर तुम्ही या आर्थिक आणीबाणीच्या काळात गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल, तर हा तुमच्यासाठी एक सुरक्षित पर्याय आहे. हे गोल्ड लोन घेताना तुम्हाला तुमचे काही दागिने हे बँकेकडे गहाण ठेवावे लागतात. त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतात. परंतु या गोल्ड लोनमध्ये एक धोका असा असतो. जर तुम्ही या गोल्ड लोनची वेळेवर परतफेड केली नाही, तर तुमचं सोनं हे जप्त होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही गोल्ड लोन घेत असाल तर त्याची वेळीच परतफेड करणे खूप गरजेची आहे.
त्याचप्रमाणे गोल्ड लोन देण्याची प्रक्रिया ही पर्सनल लोनच्या प्रक्रियेपेक्षा खूप फास्ट आहे. त्याचप्रमाणे डिजिटल गोड लोनची प्रक्रिया तर अगदी सोपी आहे. अशा प्रकारचे लोन घेताना तुमचा क्रेडिट स्कोर किंवा उत्पन्न या गोष्टींचा यावर फरक पडत नाही. यामध्ये प्रीपेमेंट सुद्धा सहजपणे होते. या गोल्ड लोनच्या योजनेमध्ये कर्जदार हा सुरुवातीला फक्त व्याज देऊ शकतो. आणि नंतर कर्जाच्या कालावधीच्या शेवटी मुद्दल जमा करू शकतो. यामध्ये संपूर्ण रक्कम एकाच वेळी भरण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
त्यामुळे जर तुमच्यावर अगदीच आर्थिक आणीबाणीची वेळ आली, तर तुम्ही पर्सनल लोनऐवजी गोल्ड लोनला प्राधान्य द्या. कारण यातून तुम्हाला खूप जलद गतीने लोन मिळेल. त्याचप्रमाणे तुमच्या सिबिल स्कोरचा यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे जास्त व्याजदर देखील या गोल्ड लोनवर आकारले जात नाही.