हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Loan : आपल्या आयुष्यात आपल्याला अनेकदा आणीबाणीच्या प्रसंगी पैशांची अडचण भासते. अशावेळी अनेकदा बँकाकडून कर्ज घेतले जाते. मात्र कर्ज घेणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तसेच जर आपला क्रेडिट स्कोअर खराब असेल किंवा ITR कधीही भरलेला नसेल तर ते आणखी अवघड होऊन जाते. मात्र, जर आपण बँकेकडे तारण म्हणून काही वस्तू दिल्या तर कर्जाची प्रक्रिया सोपी होते. अशा परिस्थितीत आपल्याकडील सोने खूप उपयोगी पडू शकते. याद्वारे आपल्या गरजेनुसार बँकेतून पैसे घेता येते.
हे लक्षात घ्या कि, बँकाकडून आपल्याला 2 प्रकारचे गोल्ड लोन दिले जाते. यामध्ये बँकेकडून गोल्ड लोन ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि गोल्ड लोन EMI चा पर्याय दिला जातो. यापैकी एक पर्याय आपल्याला निवडता येईल. मात्र आपल्या आर्थिक गरजांवर अवलंबूनच योग्य पर्यायाची निवड करावी. Gold Loan
गोल्ड लोन ओव्हरड्राफ्टची सुविधा
गोल्ड ओव्हरड्राफ्टची सुविधा हा एक चांगला पर्याय ठरू शकेल कारण ते क्रेडिट कार्डसारखेच काम करते. हे लक्षात घ्या कि, गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोनमध्ये मिळणारी रक्कम ही गोल्ड लोनच्या रकमेइतकीच असते. जेव्हा आपण एखाद्या कर्जदाराकडे सोने जमा करतो तेव्हा ते एक ओव्हरड्राफ्ट अकाउंट तयार करतात. यामध्ये सोन्याच्या किंमतींएवढीच कर्जाची रक्कम जमा केली जाते. जी आपल्याला क्रेडिट कार्डप्रमाणे वापरता येईल. याबरोबरच या खात्यावर मिळालेल्या चेकबुकचाही वापर करता येईल. तसेच या लोनमध्ये ईएमआय भरावा लागत नाही. मात्र यामध्ये एकरकमी रक्कम भरावी लागेल. तसेच यावरील व्याजदर देखील सामान्य कर्जापेक्षा खूप जास्त आहे. Gold Loan
कसा फायदा मिळेल ???
गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन सुविधेद्वारे आपल्याला क्रेडिट मर्यादेत हवा तितका खर्च करता येईल. याद्वारे ऑनलाइन खरेदी, पेमेंट ट्रान्सफर आणि बिल देखील भरता येईल. तसेच एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगद्वारे देखील गोल्ड लोन मिळवता येते. या ओव्हरड्राफ्टचा फायदा असा कि, यामध्ये उधार घेतलेल्या रकमेवरच व्याज भरावे लागेल. तसेच यासाठी खूप लवकर परवानगी देखील मिळते. तसेच कमी कागदपत्रांसहीत लवकर फंड ट्रान्सफर केला जातो. Gold Loan
यामधील जोखीम समजून घ्या
जागतिक सोन्याच्या किंमतीतील चलनवाढ, सरकारकडून सोन्याची खरेदी आणि सोन्याच्या किंमतीतील मागणी-पुरवठयातील असंतुलन यांचा गोल्ड लोन वरील व्याजावर परिणाम होतो. तसेच यामध्ये कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यास तारण ठेवलेले सोने हातातून जाऊ शकते. त्यामुळे गोल्ड लोन घेण्यापूर्वी, परतफेडीशी संबंधित सर्व माहिती व्यवस्थितपणे समजून घ्या, अन्यथा भविष्यात नुकसान होऊ शकेल. तसेच गोल्ड लोन घेण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदराची माहिती नक्कीच घ्या. Gold Loan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/loans/gold-loan
हे पण वाचा :
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Infosys चा भारतीय वंशाच्या व्यक्ती अन् मुलं असलेल्या महिलांना कामावर घेण्यास नकार?
WhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या
Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ, जाणून घ्या संपूर्ण आठवड्यातील सराफा बाजाराची स्थिती