हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल असेही त्यांनी म्हंटल.
मुंबईत केंद्र सरकारच्या वतीने वाणिज्यिक कोळशाच्या खाणींचा लिलाव व खाण क्षेत्रातील संधी या विषयावरील गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले.यावेळी शिंदे बोलत होते. या परिषदेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज उपस्थित होते.
जतमधील पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले की …
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/CAHQQZm2Qe#Hellomaharashtra @mieknathshinde
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 2, 2022
महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक आहेत, अशी माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सोन्याचे हे दोन ब्लॉक विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणतील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक (खाणी) आढळून आल्या आहेत. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल असे शिंदे यांनी म्हंटल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.