हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : सध्या स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. कारण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता अनेक विक्रेत्यांकडून मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. हे लक्षात घ्या कि, सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर ग्राहकांकडून सोन्याची खरेदी करणे बंद झाले आहेत. ज्यामुळे आता सुरु असलेल्या लग्नाच्या हंगामात सोन्याची विक्री वाढवण्यासाठी डीलर्सकडून ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते आहे.
सध्या भारतातील सोन्याच्या किंमतींवर दिल्या जाणाऱ्या सवलती या गेल्या एका महिन्यातील सर्वोच्च पातळीवर आहेत. अशातच आता डीलर्सकडून अधिकृत देशांतर्गत किंमतींपेक्षा $25 प्रति औंस पर्यंत सवलत दिली जाते आहे. ज्यामध्ये 15% आयात आणि 3% विक्री कराचा समावेश आहे. Gold Price
दरात वाढ झाल्याने खरेदीत घट
एका मीडिया रिपोर्ट मधील माहिती नुसार मुंबईतील सोन्याचे घाऊक विक्रेते असलेले अशोक जैन यांनी सांगितले की,” सोन्याच्या किंमती अचानक वाढल्यामुळे ग्राहकांना धक्काच बसला आहे, ज्याचा परिणाम हा सोन्याच्या खरेदीवर झाला आहे. यानंतर आता ग्राहक सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमती मार्चनंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत.” यासोबतच मुंबईतील एका खाजगी बँकेतील एका सराफा विक्रेत्याने सांगितले की,” सोन्यातील या दरवाढीमुळे लग्नाच्या हंगाम असूनही मागणी कमी झाली आहे. ज्यामुळे अनेक संभाव्य ग्राहकांना खरेदी पुढे ढकलावी लागली आहे.” Gold Price
येत्या काही दिवसांत मागणी सुधारेल
विंग फंग मेटल्स डीलिंगचे प्रमुख पीटर फंग यांनी सांगितले कि, “चीनमध्ये निर्बंध कमी होत असल्याने मागणीही वाढते आहे. मात्र, स्पॉट प्राईस $1,800 च्या वर गेल्याने खरेदी मर्यादितच राहिली. तसेच जर किंमती त्या पातळीच्या खाली राहिल्या तर लवकरच मागणी सुधारेल.”
हे लक्षात घ्या कि, 16 डिसेंबरला सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. यावेळी दहा ग्रॅम सोने 54,222 वर महागले तर एक किलो चांदीचा दर खाली आला असून आता तो 68,001 रुपयांना विकला जात आहे. तसेच दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 107 रुपयांनी वाढून 54,222 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा भाव 120 रुपयांनी घसरून 68,001 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/gold-rate-pune.html
हे पण वाचा :
सिमकार्डशिवाय Telegram वर साइन अप करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Jio च्या ‘या’ 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनअंतर्गत मिळवा फ्री कॉलिंगसहीत अनेक फायदे
ICICI Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार जास्त व्याज
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा