Gold Price : आज सोन्या-चांदीचे दर कितीने वाढले जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  जर तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्यासोबत चांदीचे दरही वाढले आहेत. या वाढीसह सोन्याचा भाव 48,000 च्या पुढे गेला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.11 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, चांदीचे भाव 0.50 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहेत.

सोन्या-चांदीचा भाव काय आहे जाणून घ्या
फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.15 टक्क्यांनी वाढून 48,138 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंग चांदीचा दर 0.23 टक्क्यांनी वाढला आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 62,444 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,420 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,950 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,230 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,230 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,230 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,230 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,230 रुपये
पुणे – 46,420 रुपये
नागपूर – 47,230 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -48,230 रुपये
पुणे – 48,950 रुपये
नागपूर -48,230 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4641.00 Rs 4642.00 0.022 %⌃
8 GRAM Rs 37128 Rs 37136 0.022 %⌃
10 GRAM Rs 46410 Rs 46420 0.022 %⌃
100 GRAM Rs 464100 Rs 464200 0.022 %⌃

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4894.00 Rs 4895.00 0.02 %⌃
8 GRAM Rs 39152 Rs 39160 0.02 %⌃
10 GRAM Rs 48940 Rs 48950 0.02 %⌃
100 GRAM Rs 489400 Rs 489500 0.02 %⌃

 

Leave a Comment