Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात झाली घसरण, आजचा भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारातील दबावामुळे मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. चांदीचा भाव पुन्हा एकदा 68 हजारांच्या खाली आला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी सकाळी घसरण सुरू केली. MCX वर सकाळी 9.10 वाजता सोन्याचा वायदा 198 रुपयांनी घसरून 51,373 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ही किंमत 24 कॅरेट शुद्ध सोन्याची आहे. यापूर्वी, सोने 51,342 च्या दराने खुले होते.

चांदी घसरली
MCX वर चांदीच्या फ्युचर्स किमतीतही सुरुवातीच्या ट्रेडिंग पासून घसरण दिसून आली. सकाळी, एक्सचेंजमध्ये चांदीची फ्युचर्स किंमत 199 रुपयांच्या घसरणीसह 67,906 रुपये प्रति किलो होती. सकाळी चांदीचा भाव 67,890 वर उघडला होता, जो काही काळानंतर किंचित वाढीसह ट्रेड करत होता. मात्र, मागील ट्रेडिंग दिवसाच्या तुलनेत त्यात घसरण दिसून येत आहे.

जागतिक बाजारपेठेत कमी दर
जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.15 टक्क्यांनी घसरून $1,925.60 प्रति औंस झाली. त्याच वेळी, चांदीचा स्पॉट रेट 0.46 टक्क्यांनी घसरून $25.08 प्रति औंस झाला. जागतिक बाजारातील घसरणीमुळे आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर स्वस्त झाले आहेत.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,820 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,170 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,100 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,820 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,170 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,820 रुपये
पुणे – 47,750 रुपये
नागपूर – 47,820 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,170 रुपये
पुणे – 52,100 रुपये
नागपूर – 52,170 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4805.00 Rs 4830.00 0.518 %⌃
8 GRAM Rs 38440 Rs 38640 0.518 %⌃
10 GRAM Rs 48050 Rs 48300 0.518 %⌃
100 GRAM Rs 480500 Rs 483000 0.518 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5240.00 Rs 5269.00 0.55 %⌃
8 GRAM Rs 41920 Rs 42152 0.55 %⌃
10 GRAM Rs 52400 Rs 52690 0.55 %⌃
100 GRAM Rs 524000 Rs 526900 0.55 %⌃

Leave a Comment