Gold Price : सोन्या-चांदीची चमक वाढली, आजच्या किंमती तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याचे भाव दीड वर्षांच्या उच्चांकावर गेले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी सोन्याच्या भावाने 55 हजारांची पातळी ओलांडली.

रशियावर अमेरिका आणि इतर सहयोगी देशांच्या निर्बंधांमुळे जागतिक बाजारपेठेत पिवळ्या धातूच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आणि MCX वर सकाळी 9.15 वाजता सोन्याच्या फ्युचर्स किंमती1.64 टक्क्यांनी वाढून 55,111 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचल्या. ही दीड वर्षाची मजबूत पातळी आहे. चांदीचा भावही 2.19 टक्क्यांनी वाढून 72,950 रुपये प्रति किलो झाला.

जागतिक बाजारपेठेत किंमती विक्रमी पातळीवर आहेत
जागतिक बाजारात सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड 0.6 टक्क्यांनी घसरून $2,040.07 प्रति औंसवर व्यवहार करत आहे. यापूर्वी ते $2,069.89 च्या पातळीवर पोहोचले होते. ऑगस्ट 2020 मध्ये, जागतिक बाजारात सोन्याची किंमत $2,072.49 प्रति औंस या विक्रमी उच्चांकावर होती.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 55,360 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 55,310 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 55,380 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,700 रुपये
पुणे – 50,760 रुपये
नागपूर – 50,780 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 55,310 रुपये
पुणे – 55,360 रुपये
नागपूर – 55,380  रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भा

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4949.00 Rs 4948.00 -0.02 %⌄
8 GRAM Rs 39592 Rs 39584 -0.02 %⌄
10 GRAM Rs 49490 Rs 49480 -0.02 %⌄
100 GRAM Rs 494900 Rs 494800 -0.02 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5396.00 Rs 5395.00 -0.019 %⌄
8 GRAM Rs 43168 Rs 43160 -0.019 %⌄
10 GRAM Rs 53960 Rs 53950 -0.019 %⌄
100 GRAM Rs 539600 Rs 539500 -0.019 %⌄

Leave a Comment