Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक पातळीवरील सोन्या-चांदीचे भाव वाढले होते.. मात्र आता याचं भावांमध्ये मोठी घसरण झाली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव उतरले आहेत. या कारणामुळे सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे, आज चांदीच्या किमती देखील उतरल्या आहेत. परंतु यासोबत प्लॅटिनमच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
Good Returns नुसार बुधवारी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,400 रुपयांनी (Gold Price Today) व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,530 रू. असा सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,400 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,530 रुपयांनी व्यवहार करत आहे. आई संसदीच्या काळात सोन्याच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,400 रुपये
मुंबई – 56,400 रुपये
नागपूर – 56,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,530 रूपये
मुंबई – 61,530 रूपये
नागपूर – 61,530 रुपये
चांदीचे भाव
सोन्यासोबत आज चांदीच्या किमती (Gold Price Today) देखील उतरल्या आहेत. 10 ग्रॅम चांदीचा भाव 751 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,410 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,100 रुपयांनी सुरू आहे. त्यामुळे आज चांदीच्या दागिन्यांची मागणी देखील वाढली आहे.
प्लॅटिनमची किंमत
बऱ्याच काळानंतर आज प्लॅटिनमच्या किंमती वाढल्या आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,920 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,49,200 असा सुरू आहे. त्यामुळेच सध्या प्लॅटीनमच्या दागिन्यांपेक्षा सोन्या चादींच्या दागिन्यांना जास्त मागणी करण्यात येत आहे.