Gold Price Today| जागतिक पातळीवर आर्थिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर पडताना दिसत आहे. यामुळे सध्या सोन्या चांदीचे भाव देखील घसरले गेले आहेत. नवीन वर्षाला सुरुवात झाल्यापासून सोन्या चांदीच्या भावात दररोज घट होत आहे. त्यामुळे ग्राहकांना ही दागिने खरेदीसाठी जास्त वाव मिळाला आहे. आजचे म्हणजेच गुरुवारी सोन्याचे भाव पाहिला गेलो तर त्यात मोठी घट झाली आहे.
गुरुवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57600 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,830 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57600 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,830 रुपयांनी व्यवहार करत आहे. सध्या सोन्याचे हेच भाव स्थानिक पातळीवर व्यवहार करत आहेत.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57600 रुपये
मुंबई – 57600 रुपये
नागपूर – 57600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 62,830 रूपये
मुंबई – 62,830 रूपये
नागपूर – 62,830 रूपये
चांदीचे भाव
आनंदाची बाब म्हणजे आज चांदीच्या भावात घट झाली आहे. आज, 10 ग्रॅम चांदीचा भाव 764 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,660 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,600 अशी आहे. त्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे.