Gold Price Today: काय सांगता! सोन्या-चांदीचे दर घसरले; आजचे भाव काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| सध्या नवीन वर्षाच्या निमित्ताने ग्राहक सोने खरेदी करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत. अशातच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आली आहे की, आज बऱ्याच काळानंतर सोन्या चांदीचे भाव उतरले आहेत. मध्यंतरी सोन्या-चांदीच्या किमती वाढल्यामुळे त्यांची खरेदी कधी करावी असा प्रश्न ग्राहकांपुढे निर्माण झाला होता. मात्र आता याच भावांमध्ये घसरण झाल्यामुळे सराफ बाजारात खरेदीसाठी रेलचेल पाहायला मिळत आहे.

Good Return नुसार मंगळवारी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,750 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,910 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,750 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 61,910 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज पुन्हा सोन्याचे भाव उतरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Gold Price Today
Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 56,750 रुपये
मुंबई – 56,750 रुपये
नागपूर – 56,750 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,910 रूपये
मुंबई – 61,910 रूपये
नागपूर – 61,910 रूपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

आनंदाची बाब म्हणजे, आज दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमती एकाच वेळी घसरल्या आहेत. सराफ बाजारात 10 ग्रॅम चांदीचा भाव 757 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,570 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,700 अशी आहे.