Gold Price Today | राज्यात गणेश उत्सवाच वातावरण असल्यामुळे ग्राहक सोने चांदी खरेदी करण्यावर जास्त भर देत आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मुहूर्तावर लोक जास्त सोने-चांदी खरेदी करत आहेत. परंतु ग्राहकांना दिलासा मिळावा अशा सोन्या चांदीच्या किमती कमी झालेल्या नाहीत. आज म्हणजेच गुरुवारी सराफ बाजारातील सोन्या चांदीच्या किमती कालनुसारच स्थिर राहिल्या आहेत. यामध्ये कोणतीही घट झालेली नाही. त्यामुळे आज सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चांगली खात्री बसू शकते.
Good Return वेबसाईटनुसार गुरूवारी, सराफ बाजारातील सोन्याचे भाव (Gold Price Today) कालनुसारच स्थिर आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 54,500 रुपये इतकाच आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज बाजारात 59,450 रुपये एवढी सुरू आहे. तर MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 54,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासोबत, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,450 रुपये सुरू आहे. यातूनच आज सोन्याचे भाव उतरले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,500 रुपये
मुंबई – 54,500 रुपये
नागपूर – 54,500 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 59,450 रूपये
मुंबई – 59,450 रूपये
नागपूर – 59,450 रुपये
चांदीचे आजचे भाव
विशेष म्हणजे आज चांदीचे भाव देखील स्थिर आहेत. गुरूवारी 10 ग्रॅम चांदी 735 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,350 रुपयांनी विकली जात आहे. तसेच 1 हजार ग्रॅम चांदी 73,500 रुपये भावाने सुरू आहे. बुधवारी चांदी याच भावाने विकली जात होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे चांदीचे देखील भाव वाढल्याचे दिसत आहे.
प्लॅटिनमच्या आजच्या किंमती
आज सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) वाढले असले तरी प्लॅटिनमच्या किमती कमी झाल्या आहेत. काल 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24060 रुपये एवढी होती. मात्र अजा 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,000 आहे. त्यासोबतच 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,40,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे प्लॅटिनम खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस गोल्डन चान्स आहे.