Gold Price Today : सोने झाले स्वस्त, चांदीची किंमत मात्र वाढली; पहा आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नाचे हंगाम तोंडावर (Gold Price Today) असताना तुम्ही जर सोने खरेदी करण्यास उत्सुक असाल तर आजचा दिवस आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कारण, गेल्या आठवड्यात विक्रमी उच्चांक गाठलेल्या सोन्याच्या किंमतीत आज बुधवारी, 18 जानेवारी 2023 रोजी मात्र घसरण झालेली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत मात्र वाढ कायम राहिली आहे.

Gold Price Today

 

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (MCX ) सकाळी (Gold Price Today) सोन्याच्या दरात 0.14% म्हणजेच 77 रुपयांनी घट झालेली पाहायला मिळाली. MCX वर प्रति 10 ग्रॅम सोने 56,275 रुपयांवर व्यवहार करत होते. मागील सीजन मध्ये हीच किंमत 56,352 होती. त्यामुळे सोन्याच्या किमतीत 77 रुपयांची घसरण झालेली आहे. तर दुसरीकडे चांदीची चमक अजूनही कायम आहे. चांदीच्या किमतीत 0.19 टक्के म्हणजेच जवळपास 134 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा दर 69,320 रुपये झाला आहे.

Gold Price Today

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे : 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,730 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,730 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,730 रुपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)

साधारणतः नागरिक (Gold Price Today) सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते-

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी (Gold Price Today) दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.