Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या आजचा भाव काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक स्तरावरील सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये देखील मोठा बदल पाहायला मिळत आहे. सलग एक आठवड्यांपासून सोने चांदीच्या किमती वाढल्या आहेत. या किमतींमध्ये ग्राहकांना दिलासा मिळेल अशी कोणतीही घट झालेली नाही. त्यामुळे अशावेळी ग्राहकांनी सोन्याची खरेदी नक्की कधी करावी? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्य म्हणजे, सोन्यासोबत मौल्यवान चांदीच्या किमतींमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या काळात मौल्यवान धातूंची खरेदी करणे ग्राहकांना परवडत नाहीये.

आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी, MCX वेबसाईटवर सोन्याचा बाजार भाव प्रति 10 ग्रॅमने 55,040 रुपयेच असा सुरू आहे. यासोबत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,050 रूपयांनी व्यवहार करत आहे. तर गुडरिटर्न्सनुसार देखील, आज सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. मंगळवारी सराफ बाजारात, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,200 रूपयांनी वाढला आहे. तसेच, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,070 रूपयांनी व्यवहार करत आहे. याचबरोबर, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 100 ग्रॅम भाव 5,42,000 रुपये असा सुरु आहे.

(Gold Price Today) गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,200 रुपये
मुंबई – 54,200 रुपये
नागपूर – 54,200 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,070 रूपये
मुंबई – 59,070 रूपये
नागपूर – 59,070 रुपये

दररोज जाणून घ्या सोन्या-चांदीच्या किमती

सराफ बाजारात रोज सोन्या-चांदीचे दर बदलत असतात. त्यामुळे ग्राहक सराफ दुकानात जाऊन सतत सोने चांदीच्या भावांची चौकशी करू शकत नाही. त्यामुळेच २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी ग्राहक 8955664433 वर मिस कॉल करू शकता. यानंतर थोड्याच वेळात तुमच्या फोनवर एसएमएस द्वारे सोन्याचे भाव सांगितले जातील. तसेच , रोजच्या अपडेटसाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला ही भेट देऊ शकता.