Gold Price Today : दसऱ्याच्या दिवशी सोने महागले, तर चांदीच्या दरात मात्र घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | आज संपूर्ण राज्यात दसरा सण धुमधडाक्यात साजरी केला जात आहे. या शुभमुहूर्तावर आज सराफ बाजारात देखील रेलचेल पाहिला मिळत आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात सोन्या चांदीचे बाजार भाव वाढले आहेत. मंगळवारी सोन्याच्या किमतींचा पारा आणखीन वर चढला आहे. तर चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोन्या पेक्षा चांदीची खरेदी जास्त प्रमाणात करण्यात येत आहे.

Good Returns मंगळवारी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,550 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,690 रू. असा सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,600 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61, 750 रुपयांनी व्यवहार करत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमती (Gold Price Today) वाढल्यामुळे ग्राहकांची निराशा झाली आहे.

Gold Price Today
Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 56,550 रुपये
मुंबई – 56,550 रुपये
नागपूर – 56,550 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,690 रूपये
मुंबई – 61,690 रूपये
नागपूर – 61,690 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

सर्वांत आनंदाची गोष्ट म्हणजे आज चांदीच्या किमती (Gold Price Today) उतरल्या आहेत. मंगळवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 746 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,460 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,600 रुपयांनी सुरू आहे. त्यामुळे आज चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे.

प्लॅटिनमची किंमत

सोन्या सोबत आज प्लॅटिनमच्या किमती देखील वाढल्या आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24 हजार रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,40,500 असा सुरू आहे. ज्यामुळे प्लॅटिनम खरेदी करणे ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर गेले आहे.