Gold Price Today| आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे सोने आणि चांदीचे भाव दररोज वाढताना दिसत आहेत. आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावामध्ये कमालीची वाढ झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या या किमती कमी होतील असा अंदाज सध्यांकडून वर्तवला जात होता. मात्र आता हा अंदाज खोटा ठरला असून सराफ बाजारातील सर्वच मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. चला तर मग पाहूयात आजच्या सोन्या-चांदीच्या किमती.
Good Returns नुसार आज, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,960 रू. असा सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,800 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,960 रुपयांनी व्यवहार करत आहे. स्थानिक पातळीवर याच किमतीने सोने व्यवहार करत आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,800 रुपये
मुंबई – 56,800 रुपये
नागपूर – 56,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,960 रूपये
मुंबई – 61,960 रूपये
नागपूर – 61,960 रुपये
चांदीचे भाव
आज चांदीच्या भावात (Gold Price Today) देखील कमालीची वाढ झाली आहे. गुरूवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 751 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,510 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 75,100 रुपयांनी सुरू आहे. पुन्हा एकदा चांदीच्या आजच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांची निराशा झाली आहे.
प्लॅटिनमची किंमत
आज प्लॅटिनमच्या किमती देखील वाढले आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,030 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,40,300 असा सुरू आहे. ज्यामुळे ग्राहकांना आजच्या दिवशी मौल्यवान धातूंचे खरेदी करणे खिशाला परवडण्याच्या बाहेर गेले आहे.