Gold Price Today : सोन्याचे भाव वाढले, मात्र चांदीच्या किंमतीत मोठी घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| राज्यात दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. यानिमित्ताने सोने खरेदी करण्यावर ग्राहक जास्त भर देताना दिसत आहे. मात्र सध्या सोन्या चांदीच्या किमती वाढल्यामुळे याच ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीचे भाव उतरले आहेत. यासोबत प्लॅटिनमच्या किमतीत देखील घसरण झाली आहे.

Good Returns नुसार आज, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची (Gold Price Today) किंमत 56,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,960 रू. असा सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,800 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,960 रुपयांनी व्यवहार करत आहे. शुक्रवारी सोने चांदीच्या किमतींमध्ये घसरण झाली नसल्यामुळे सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 56,800 रुपये
मुंबई – 56,800 रुपये
नागपूर – 56,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,960 रूपये
मुंबई – 61,960 रूपये
नागपूर – 61,960 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

शुक्रवारी सोन्याचे भाव वाढले असले तरी चांदीच्या किमतींमध्ये (Gold Price Today) मोठी घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 746 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,460 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,600 रुपयांनी सुरू आहे. यामुळेच आज चांदीच्या दागिन्यांची जास्त मागणी केली जात आहे.

प्लॅटिनमची किंमत

आज प्लॅटिनमच्या किमती देखील कमी झाल्या आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,240 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,42,400 असा सुरू आहे. त्यामुळे वेग ग्राहक आज चांदी आणि प्लॅटिनमची खरेदी करतील त्यांना कमी पैसे मोजावे लागतील.