Gold Price Today | अवघ्या एक आठवड्यावर दिवाळी सण आला आहे. परंतु याच काळात सोन्या-चांदीचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आज सोन्याचे भाव 61 च्या वर गेले आहेत, मात्र चांदीचे आजचे भाव उतरले आहेत. चांदीच्या किमती घसरल्यामुळे सोन्याऐवजी चांदीच्या दागिन्यांची जास्त खरेदी करण्यात येत आहे.
Good Returns नुसार शुक्रवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,600 रुपयांनी (Gold Price Today) व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,750 रूपये सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,600 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,750 रुपयांनी व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक पातळीवर सोने याच किमतींवर व्यवहार करत आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव-
(Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,600 रुपये
मुंबई – 56,600 रुपये
नागपूर – 56,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,750 रूपये
मुंबई – 61,750 रूपये
नागपूर – 61,750 रुपये
चांदीचे भाव
आज बऱ्याच काळानंतर चांदीचे भाव (Gold Price Today) उतरले आहेत. शुक्रवारी, 10 ग्रॅम चांदीचा भाव 741 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,410 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,100 रुपयांनी सुरू आहे. यापूर्वी चांदी 745 रुपयांनी व्यवहार करत होती.
प्लॅटिनमची किंमत
ऐन सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या असल्या तरी प्लॅटिनमच्या किमती घसरल्या आहेत. आज 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,720 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,47,200 असा सुरू आहे. ज्यामुळे प्लॅटिनम नेकलेस, प्लॅटिनम रिंग आणि इयरिंग्स अशा दागिन्यांची जास्त मागणी केली जात आहे.