Gold Price Today| नवीन वर्ष सुरू व्हायला अवघा एक दिवस राहिला आहे. मात्र तरीदेखील सोन्या चांदीच्या भावात ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही. आज पुन्हा एकदा सोने चांदीचे भाव वाढले आहेत. यापूर्वी दिवाळी दसऱ्याच्या काळामध्ये सोन्याचे भाव कमी झाले होते. आता डिसेंबर महिन्यात पुन्हा सोन्या-चांदीच्या किमतींची तेजी वाढली आहे. त्यामुळे आज सोने चांदी खरेदी करायचे असेल तर पहिले आजचे भाव तपासा.
Good Return नुसार शनिवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,550 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,870 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,550 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,870 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आता सोन्याचे भाव उतरेपर्यंत ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 58,550 रुपये
मुंबई – 58,550 रुपये
नागपूर – 58,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,870 रूपये
मुंबई – 63,870 रूपये
नागपूर – 63,870 रूपये
चांदीचे भाव
देशपातळीवर वाढता महागाईमुळे चांदीचे भाव देखील वाढले आहेत. शनिवारी,10 ग्रॅम चांदीचा भाव 786 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,860 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 78,600 अशी आहे. यापूर्वी चांदी, 783 , 7830, 78300, रुपयांनी व्यवहार करत होती.