Gold Price Today| नव्या वर्षात सोन्या चांदीच्या भावाला उतरली कळा लागली आहे. 2023 वर्षाच्या अखेरीस सोन्या – चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता नव्या वर्षात हेच भाव कमी होत चालले आहेत. आज म्हणजेच शुक्रवारी सोने उतरले आहे. तसेच, चांदीच्या किंमती देखील उतरल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना या काळात सोने खरेदी करणे परवडणार आहे.
शुक्रवारी Good Return नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,270 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,000 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,270 रुपयांनी व्यवहार करत आहे. यापूर्वी सोन्याच्या किमती 64 हजारांवर पोहचल्या होत्या.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 58,000 रुपये
मुंबई – 58,000 रुपये
नागपूर – 58,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,270 रूपये
मुंबई – 63,270 रूपये
नागपूर – 63,270 रूपये
चांदीचे भाव
शुक्रवारी चांदीचे भाव देखील उतरलेले आहेत. आज, 10 ग्रॅम चांदीचा भाव 766 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,660 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,600 अशी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना एकाच वेळी सोने आणि चांदीची खरेदी करता येणार आहे..