Gold Price Today : अरे बाप रे!! सोन्याचा भाव वाढला मात्र चांदीची चकाकी उतरली; पहा आजच्या किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | मागील काही काळापासून सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक पातळीवरील सोन्या-चांदीचे भाव देखील कमी जास्त होत आहेत. त्यामुळेच गुरुवारपर्यंत घसरलेल्या सोन्याच्या किमतींमध्ये शुक्रवारी अचानकपणे वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या किमती घसरल्या आहेत. चांदीबरोबर प्लॅटिनमच्या किमती देखील कमी झाल्यामुळे आज सोन्यापेक्षा जास्त प्रमाणात चांदी आणि प्लॅटिनमची खरेदी करण्यात येत आहे.

शुक्रवारी Good Returns नुसार सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,730 रूपये असा सुरू आहे. तर MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,500 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,230 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज MCX वेबसाईटवरील सोन्याच्या किमती कमी आहेत तर Good Returns नुसार याच किमती वाढल्या आहेत.

Gold Price Today

(Gold Price Today) GoodReturn वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 52,500 रुपये
मुंबई – 52,500 रुपये
नागपूर – 52,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,730 रूपये
मुंबई – 57,730 रूपये
नागपूर – 57,730 रुपये

Gold Price Today

चांदीचे भाव

गेल्या दोन दिवसापासून वाढलेले सोन्या-चांदीचे भाव आज मात्र कमी झाले आहेत. शुक्रवारी 10 ग्रॅम चांदी 706 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,060 रुपये विकली जात आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 70,600 रुपयांनी सुरू आहे. चांदीच्या आजच्या भावात -05, -50, -500 अशा फरकाने घसरण झाली आहे.

प्लॅटिनमची किंमत

आज सोन्याच्या किमती जरी वाढल्या असल्या तरी चांदीच्या आणि प्लॅटिनम च्या किमतीत घसरत झाली आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 22,990 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,29,200 असा सुरू आहे. त्यामुळे आजच्या दिवशी प्लॅटिनमची खरेदी करणे ग्राहकांना परवडू शकते.