Gold Price Today : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या भावात घट; पहा आजच्या किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव दणदणीत घसरले आहेत. त्यामुळे आज ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की सध्या सराफ बाजारात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर विविध दागिन्यांच्या नवीन नवीन व्हरायटीज झाल्या आहेत. तसेच, अनेक सराफांच्या दुकानांत सोने खरेदीवर ऑफर सुरू आहे. त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रथम आजचे सोन्याचे भाव तपासा आणि सराफ बाजारात जाऊन हवे ते दागिने खरेदी करा.

आज म्हणजेच गुरुवारी Good Returns नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,700 रुपयांनी (Gold Price Today) व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,760 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,700 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,760 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आज सोन्या चांदीचे दागिने योग्य दरात मिळू शकतात.

Gold Price Today
Gold Price Today

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 55,700 रुपये
मुंबई – 55,700 रुपये
नागपूर – 55,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 60,760 रूपये
मुंबई – 60,760 रूपये
नागपूर – 60,760 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

दिवाळीच्या पहिल्या दिवशीच म्हणजे वसुबारस सणानिमित्त चांदीचे भाव (Gold Price Today)  देखील कमी झाले आहेत. 10 ग्रॅम चांदीचा भाव 732 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,320 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 73,200 रुपयांनी सुरू आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर महागाई वाढली असली तरी सध्या स्थानिक पातळीवरील चांदीचे भाव घसरलेले दिसत आहेत.

वसुबारस सण

दिवाळी सणाची खरी सुरुवात ही वसुबारस सणापासून सुरू होते. आजच्या दिवसापासून दारोदारी पणत्या लावण्यात येतात. अंगणात रांगोळी काढली जाते. त्याचबरोबर गाईची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. आजच्या दिवशी शेतकरी आपल्या गाईंना आंघोळ घालतो. तिची पूजा करतो. तसेच तिच्याविषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो.