हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक संकेतांमुळे बुधवारी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. आज आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही धातूंच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. MCX वर आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये सोने 0.24 टक्क्यांनी घसरले आहे. तर चांदीचा दरही 0.73 टक्क्यांनी खाली आहे. यामुळे सोन्याचा भाव आता दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे.
MCX वर बुधवारी सकाळी 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 116 रुपयांनी घसरून 49,203 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. हे लक्षात घ्या कि, बुधवारी MCX वर 49,160 रुपयांच्या पातळीवरून सोन्याचे ट्रेडिंग सुरू झाले. याच्या काही वेळातच ते 49,241 रुपयांवर पोहोचले. मात्र यानंतर त्यामध्ये किंचित घसरण होऊन ते 49,203 रुपयांवर आले. Gold Price Today
आज MCX वर आज चांदीचा दर 406 रुपयांनी घसरून 54,973 रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीचे ट्रेडिंग 55,200 रुपयांपासून सुरू झाले. याच्या काही काळानंतर सोन्याचा भाव 54,835 रुपयांपर्यंत घसरला. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,000 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,970 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,000 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45,800 रुपये
पुणे – 45,830 रुपये
नागपूर – 45,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,970 रुपये
पुणे – 50,000 रुपये
नागपूर – 50,000 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4603.00 | Rs 4603.00 | 0 % |
8 GRAM | Rs 36824 | Rs 36824 | 0 % |
10 GRAM | Rs 46030 | Rs 46030 | 0 % |
100 GRAM | Rs 460300 | Rs 460300 | 0 % |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5023.00 | Rs 5023.00 | 0 % |
8 GRAM | Rs 40184 | Rs 40184 | 0 % |
10 GRAM | Rs 50230 | Rs 50230 | 0 % |
100 GRAM | Rs 502300 | Rs 502300 | 0 % |
हे पण वाचा :
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा
SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या