हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आज देशांतर्गत वायदे बाजारावर त्याचा परिणाम दिसत नाहीये. MCX वर एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 79 रुपयांनी वाढून 56, 205 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते. त्याच वेळी, मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 304 रुपयांच्या वाढीसह 65,725 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.
गेल्या ट्रेडिंग सत्रात, एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 56,126 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावला होती. तसेच मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत किलोमागे 65,421 रुपयांवर बंद झाली. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र आज सोन्याच्या किंमतींत घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट प्राईस 14.39 डॉलरने घसरून 1,840.50 डॉलर प्रति औंस वर तर चांदीची स्पॉट प्राईस $ 0.10 ने घसरून $ 21.77 प्रति औंस वर आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,730 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,730 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,730 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, कर्जावरील व्याजदरात केली वाढ