हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतानंतरही गुरुवारी (29 सप्टेंबर रोजी) भारतीय वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती रेड मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. 3 दिवसांच्या घसरणीनंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या स्पॉट किंमतीत जोरदार झाल्याचे पहायला मिळते आहे. आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये MCX वर सोन्याचा भाव 0.20 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच चांदीचा दर कालच्या बंद किंमतीच्या तुलनेत 0.64 टक्क्यांनी तुटला आहे. Gold Price Today
MCX वर आज सकाळी 9:10 वाजता 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 99 रुपयांनी घसरून 49,651 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आज MCX वर सोन्याचे ट्रेडिंग 49,650 रुपयांच्या पातळीवरून सुरू झाले. मात्र सध्या सणासुदीचा हंगाम असूनही सोन्याचे भाव वाढलेले नाहीत. आज MCX वर चांदीमधील घसरणीचा कल कायम राहिला. आज चांदीचा भाव 362 रुपयांनी घसरून 56,166 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today
सलग 3 दिवस घसरण झाल्यानंतर गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. आज सोन्यामध्ये 1.48 टक्के तर चांदीच्या दरात 2.06 टक्क्यांची वाढ झाली आहे. सोन्याची स्पॉट प्राईस आज प्रति औंस $1,653.16 वर गेली आहे. तसेच चांदीचा भाव आज 18.77 डॉलर प्रति औंस झाला आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,430 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50.650 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50.620 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,430 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50.650 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,400 रुपये
पुणे – 46,430 रुपये
नागपूर – 46,430 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50.620 रुपये
पुणे – 50.650 रुपये
नागपूर – 50.650 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4603.00 | Rs 4603.00 | 0 % |
8 GRAM | Rs 36824 | Rs 36824 | 0 % |
10 GRAM | Rs 46030 | Rs 46030 | 0 % |
100 GRAM | Rs 460300 | Rs 460300 | 0 % |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5023.00 | Rs 5023.00 | 0 % |
8 GRAM | Rs 40184 | Rs 40184 | 0 % |
10 GRAM | Rs 50230 | Rs 50230 | 0 % |
100 GRAM | Rs 502300 | Rs 502300 | 0 % |
हे पण वाचा :
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा
SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या