हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) वाढ कायम राहिली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर आज १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव 71400 रुपये आहे. कालच्या तुलनेत 0.38% म्हणजेच 270 रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी वाढ पाहायला मिळत आहे. MCX वर एक किलो चांदीचा भाव 82836 रुपये आहे. चांदीच्या दरात सुद्धा 0.47% म्हणजेच 386 रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईतच्या काळातच ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
MCX वर आज सकाळी ९ वाजता १० ग्राम २४ कॅरेट सोने ७१४४७ रुपयांवर व्यवहार करत होते. मात्र तासाभरातच या किमतीत लक्षणीय वाढ (Gold Price Today) पाहायला मिळाली. १० वाजताच सोन्याचा भाव ७१६११ रुपये झाला आणि त्यानंतर सोन्याची घोडदौड अजूनही सुरूच आहे. आत्ता १२ वाजता १० ग्राम २४ कॅरेट सोने ९१६९४ रुपयांवर व्यवहार करत आहे. आज दिवसअखेर या किमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, १० ग्राम २४ कॅरेट सोने ७२२६० रुपये आहे तर चांदी ८५५०० रुपये प्रतिकिलो आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 66,100 रुपये
मुंबई – 66,100 रुपये
नागपूर – 66,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 72,110 रूपये
मुंबई – 72,110 रूपये
नागपूर – 72,110 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.