Gold Price Today | सोन्या चांदीच्या किमतीत दररोज वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या बदलांमुळे याचे परिणाम स्थानिक पातळीवर देखील होताना दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सराफ बाजारात सोन्याच्या भावांनी उच्चांक गाठला होता. मात्र गुरुवारी हेच भाव कमी झालेले दिसत आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी आहे. गुरुवारी सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे याचा फायदा व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना झाला आहे.
सध्या वेगवेगळ्या ऑनलाईन वेबसाईट्स सोन्या-चांदीच्या किमती (Gold Price Today) सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार, MCX वेबसाईट गुरुवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,460 रुपये असा सांगत आहे. तर तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,500 रूपयांनी व्यवहार करत असल्याचे दाखवत आहे. तसेच गुडरिटर्न्सनुसार, गुरुवारी सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,700 रूपयांनी सुरू आहे. त्याचबरोबर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,670 रूपयांनी व्यवहार करत आहे.
गुडरिटर्न्सनुसार, गुरुवारी चांदीच्या किमती देखील उतरले आहेत. मौल्यवान असणाऱ्या चांदीने जागतिक पातळीवर उच्चांक काढला असताना आज मात्र हेच भाव उतरलेले दिसत आहेत. आज 10 ग्रॅम चांदीची किंमत बाजारात 730 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,300 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे बुधवारच्या दरानुसार, आज चांदीच्या भावात 50 रुपयांचा फरक पडला आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी देखील आजचा दिवस योग्य ठरला आहे.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,700 रुपये
मुंबई – 54,700 रुपये
नागपूर – 54,700 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 59,670 रूपये
मुंबई – 59,670 रूपये
नागपूर – 59,670 रुपये
दरम्यान, सराफ बाजारात रोज सोन्या-चांदीचे दर बदलत असतात. त्यामुळे ग्राहक सराफ दुकानात जाऊन सतत सोने चांदीच्या भावांची चौकशी करू शकत नाही. त्यामुळेच २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी ग्राहक 8955664433 वर मिस कॉल करू शकता. यानंतर थोड्याच वेळात तुमच्या फोनवर एसएमएस द्वारे सोन्याचे भाव सांगितले जातील. तसेच , रोजच्या अपडेटसाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला ही भेट देऊ शकता.