Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत वाढ; पहा आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय वायदा (Gold Price Today) बाजारमध्ये आज 14 नोव्हेंबर 2022 रोजी सोने चांदीच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात 0.06 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. त्याच वेळी, चांदीचा दर 0.23 टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.

Gold Price Today

10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची (Gold Price Today) किंमत आज रुपये 48,260 असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 48,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,368 रुपये आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही आपल्याला वाढ झाल्याचे दिसत आहे. चांदीचा दर आज 139 रुपयांनी वाढून 61,710 रुपयांवर पोहोचला आहे.

Gold Price Today

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,670 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,260 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,640 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,670 रुपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी (Gold Price Today) दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.