Gold Price Today : अबब! सोन्या चांदीच्या किमतींनी मारली उसळी; खरेदीदारांनो, आजचे भाव नक्की तपासा

Gold Price Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव उतरतील असा अंदाज सर्वांकडून लावला जात होता. परंतु आता हा अंदाज खोटा ठरला असून आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी नक्की सोन्याचे भाव तपासावेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी सोन्याचे भाव पूर्णपणे घसरले होते. मात्र आता याच भावात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसत आहे.

शुक्रवारी Good Return वेबसाईटनुसार, सराफ बाजारातील सोन्याच्या किंमती (Gold Price Today) वाढल्या आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 54,700 रुपये इतकाच आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज बाजारात 59,670 रुपये एवढी सुरू आहे. यासोबतच MCX वेबसाईटनुसार पाहिला गेलो तर, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 54,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासोबत, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,670 रुपये सुरू आहे. यातूनच आजचे सोन्याचे भाव गगनाला भिडल्याचे दिसत आहे.

Gold Price Today

(Gold Price Today) गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,700 रुपये
मुंबई – 54,700 रुपये
नागपूर – 54,700 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,670 रूपये
मुंबई – 59,670 रूपये
नागपूर – 59,670 रुपये

Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

आजचे आपण चांदीचे भाव पाहिला गेलो तर चांदीच्या किमतीत (Gold Price Today) देखील वाढ झाली आहे. शुक्रवारी 10 ग्रॅम चांदी 740 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,400 रुपयांनी विकली जात आहे. तसेच 1 हजार ग्रॅम चांदी 74,000 रुपये भावाने सुरू आहे. गणेश उत्सवाच्या काळात चांदीमध्ये झालेली वाढ ग्राहकांच्या खिशाला कात्री बसवत आहे. त्यामुळे सोन्यासोबत आज चांदीदेखील ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर गेली आहे.

प्लॅटिनमच्या आजच्या किंमती

आज सर्वच मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्याचे चित्र दिसत आहे. सोन्या-चांदीसोबत प्लॅटिनम च्या किमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. काल 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24060 रुपये एवढी होती. मात्र शुक्रवारी 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,410 आहे. त्यासोबतच 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,44,100 रुपयांनी व्यवहार करत आहे.