हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफा बाजारात आज १६ जुलै २०२४ रोजी सोन्या चांदीच्या किमतीत (Gold Price Today) किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे, त्यामुळे आधीच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज २४ कॅरेट १० ग्राम सोने 73475 रुपयांवर व्यवहार करत असून कालच्या तुलनेत या किमती 164 रुपयांनी वधारल्या आहेत. तर दुसरीकडे चांदीचा दर 92848 रुपये असून या किमतीत 311 रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
आज MCX वर सोन्याचा भाव ७३४५५ रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमती (Gold Price Today) खाली गेल्या. १० वाजता सोन्याच्या भावाने ७३३८९ रुपयांच्या निच्चांकी पातळीवर गेला. मात्र यानंतर सोन्याच्या किमतींनी चांगलीच उभारी घेतली. ११ वाजता सोन्याचा भाव ७३५०० रुपयांवर गेला. त्यानंतर या किमतीत थोडी घसरण पाहायला मिळून सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोने 73475 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमती थोड्याफार प्रमाणात वाढल्याने सोने खरेदीदार ग्राहकांसाठी हि आनंदाची गोष्ट आहे.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 67,850 रुपये
मुंबई – 67,850 रुपये
नागपूर – 67,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 74,020 रूपये
मुंबई – 74,020 रूपये
नागपूर – 74,020 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.