Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठा बदल; आजचे दर काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नसराईताचा धामधुमीत गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) चांगलीच वाढ होताना दिसत आहे. हाच ट्रेंड अजूनही सुरूच असून आज 17 एप्रिल 2023 मध्ये सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे तर दुसरीकडे चांदीचे दर मात्र किंचित उतरले आहेत. आज एमसीएक्स गोल्ड जून फ्युचर्स 34 रुपयांच्या वाढीसह 60,363 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसत आहेत.तर चांदीचा मे वायदा 52 रुपयांनी घसरून 75, 625 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता.

Gold Price Today

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 55,940 रुपये
पुणे – 55,940 रुपये
नागपूर – 55,940 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 61,030 रुपये
पुणे – 61,030 रुपये
नागपूर – 61,030 रुपये
Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.